राज्यात पुन्हा कोरानाचा धोका वाढला
मुंबई: केंद्र सरकारने कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. पुन्हा मास्क लावा अशी सूचना सर्व राज्यांना कालच केली होती. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
देशभरात एका दिवसात 1 हजार 805 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात नव्या 205 रुग्णांची भर पडली आहे. राज्यसरकारप्रमाणेच मुंबई महापालिकेनेही वाढत्या कोरोना रुग्णांची गंभीरतेने दाखल घेत पालिका रुग्णालये सज्ज ठेवली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.