Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिवसाला करा केवळ ५० रुपयांची गुंतवणूक, मिळतील ३५ लाख

दिवसाला करा केवळ ५० रुपयांची गुंतवणूक, मिळतील ३५ लाख


जर तुम्हाला मजबूत बँक बॅलन्स तयार करायचा असेल किंवा जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला अशा स्कीम्समध्ये गुंतवणूक करावी लागेल जिथे तुम्हाला उत्कृष्ट परतावा मिळतो. नोकरी किंवा व्यवसाय करण्यासोबतच बचत करणंही खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ही बचतही योग्य ठिकाणी गुंतवली पाहिजे. यासह, तुम्ही लवकरच एक मोठा बँक शिल्लक तयार करण्यात सक्षम व्हाल.

सरकारही लोकांच्या सोयीसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबवते. यामध्ये तुम्हाला चांगल्या रिटर्न्ससोबत अनेक सुविधा मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. दररोज काही रुपये वाचवून तुम्ही स्वतःसाठी चांगला बँक बॅलन्स तयार करू शकता.

काय आहे ग्राम सुरक्षा योजना?

पोस्ट ऑफिसची ही स्कीम तुम्हाला उत्कृष्ट रिटर्न देणारी आहे. देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी पोस्ट ऑफिस हे एक महत्त्वाचं आर्थिक स्त्रोत आहे. हे ग्रामीण लोकांना पैसे वाचवण्यास आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करतं. देशातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन भारतीय टपाल विभागानं अनेक जोखीममुक्त बचत योजना सुरू केल्या आहेत. त्यातून चांगला परतावा मिळतो. अशीच एक स्कीम म्हणजे पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना. पोस्ट ऑफिसनं रुरल पोस्टल लाईफ इन्शूरन्स पॉलिसीची १९९५ मध्ये सुरूवात केली होती.

कोण करू शकतं गुंतवणूक?

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूकदाराचे वय १९ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावं. या योजनेत, मॅच्युरिटी रक्कम जास्तीत जास्त वयाच्या ८० व्या वर्षी मिळू शकते. यामध्ये तुम्ही १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. प्लॅनमध्ये, तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता. ही पॉलिसी आहे जी पाच वर्षांच्या कव्हरेजनंतर विमा पॉलिसीमध्ये बदलली जाऊ शकते.

असा तयार होईल ३५ लाखांचा फंड

या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना दररोज फक्त ५० रुपये गुंतवावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही एका महिन्यात १५०० रुपयांची गुंतवणूक कराल. तुम्ही वयाच्या ५५ ​​वर्षापर्यंत ही पॉलिसी घेतल्यास तुम्हाला १.६० लाख रुपयांसाठी १५१५ रुपये द्यावे लागतील. ५८ वर्षात ३३.४० लाख रुपये मिळवण्यासाठी १,४६३ रुपये आणि ६० वर्षांच्या मॅच्युरिटीवर ३४.६० लाख रुपये मिळवण्यासाठी दरमहा केवळ १४११ रुपये द्यावे लागतील.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.