'कृषीमंत्री सुप्रिया सुळे यांना शिविगाळ करतात, आणि मांडीला मांडी लावून बसतात'
मालेगावमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे आमदार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते म्हणाले, अब्दुल सत्तार महिलेला शिवीगाळ करतात आणि तरीही मंत्रिमंडळात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करतात आणि मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसतात हे यांच हिंदुत्व, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना दिव्यदृष्टी आलेली आहे. काळोखात जाऊन नुकसान बघतात असे दिव्यदृष्टी असलेले आमचे कृषीमंत्री असल्याचे देखील ठाकरे यांनी म्हटले आहे.
मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी अद्वय आपण शपथ घेतली. पण मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही तर तुमच्या प्रश्नांसाठी लढायचं. आता एकच जिंकेपर्यंत लढायचं, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. आजची सभा अथांग पसरलेली आहे. आपलं नाव, धनुष्यबाण चोरलेले आहे. माझ्या हातात काही नाही तरीदेखील एवढी गर्दी ही पूर्वजांची पुण्यायी आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, मलाच कळत नाही आजच्या या सभेचे वर्णन करायचे? पंधरा दिवसांपूर्वी खेडला अतिविराट सभा होती. अभूतपूर्व असे ते दर्शन होते. जगभरात कोरोना संकट आलं होतं. एक मुंबईतील धारावी आणि दुसरं मालेगाव.
पोलीस बंदोबस्ताला येत ते सगळे कोरोनाग्रस्त. कुणाचा थांगपत्ता लागला नाही. मी मालेगावातील धर्मगुरुंशी बोललो. तुम्ही तेव्हा सहकार्य केले नसत तर मालेगाव वाचले नसते. मी घरात बसून सांगितले ते तुम्ही ऐकलं त्यासाठी धन्यवाद मानतो, असेही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.