त्या पत्रकाराला कारागृहात पण उपचारांसाठी सिव्हीलमध्ये
सांगली चा ''तो ''पत्रकार "24 "तासाने कारागृहात जमा. शेअर्स घोटाळा, फसवणूक व्यवहारातील संशयित आरोपी यास शेवटच्या" 24" तासाच्या पोलीस कोठडीने त्याची रवानगी अखेर कारागृहात करण्यात आली. आजारी असल्याने उपचार घेण्याचे कारण पुढे आले समजते त्यामुळे वशिलाबाजी लावून जेल टाळ् न्याचे प्रकार समजत आहे. आरोपीला मेडिकल बोर्डा समोर हजर करा, त्याच्या आजाराचे दूध का दुध पानी का पानी होऊन जाईल. अशी मागणी केली जात आहे. संशयित आरोपीस प्रथम तीन दिवस, दुसऱ्यांदा तीन दिवस व शेवटी 24 तास म्हणजे एक दिवस पोलीस कोठडी न्यायालयाणे दिली होती.
या गुन्ह्यात अजून काही आरोपी परागंदा आहेत. या गुन्ह्यात असणारे काही आरोपी यापूर्वी अटक करून त्यांची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती. मात्र त्याने छातीत दुखण्याचा बहाणा केल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला सांगलीच्या सिव्हील हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोकांचे पैसे बुडवताना त्याच्या छातीत दुखले नाही. मात्र न्यायालयाने जेलमध्ये रवानगी करताच त्याच्या छातीत कसे दुखू लागले असा प्रश्न आता विचारला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.