Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

५ लाखाची लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.

५ लाखाची लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.


गुजरात येथील राजकोटमध्ये एका अधिकाऱ्याला लाच घेण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर या अधिकाऱ्याने सीबीआय कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. परकीय व्यापार संचालनालयाचे संयुक्त संचालक जवरीमल बिश्नोई यांना सीबीआयने पाच लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात अटक केली होती. या कथित लाचेच्या प्रकरणात सीबीआयने सापळा रचून कारवाई केली होती. डीजीएफटीचे संयुक्त संचालक जेएम बिश्नोई यांनी फूड कॅनच्या निर्यातीसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी ९ लाख रुपयांची लाच मागितली होती.

बिश्नोई यांनी पहिल्या टप्प्यात पाच लाख रुपयांची मागणी केली होती. उर्वरित रक्कम एनओसी देतांना देण्याचे ठरले होते. या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने सापळा रचला आणि बिश्नोई यांना पाच लाख रुपये घेतांना रंगेहात पकडले. या प्रकरणात आता बिश्नोई यांच्यावर सीबीआय कारवाई करणार होते. रंगेहात पकडल्यामुळे कारावासासह नोकरी आणि सरकारी सुविधाही गमवाव्या लागण्याची शक्यता होती. अशात नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

पाचव्या माळ्यावरून उडी

सीबीआय कार्यालयातल्या चौथ्या मजल्यावरुन जवरीमल बिश्नोई यांनी सकाळी उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.