Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भीषण अपघातात पिकअप जीपने दोन दुचाकींसह 8 जणांना चिरडले

भीषण अपघातात पिकअप जीपने दोन दुचाकींसह 8 जणांना चिरडले


पुणे :  जुन्नरमध्ये पिकअप जीपने दोन दुचाकींसह 8 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये सुंदराबाई मधे (वय २८ वर्षे), गौरव मधे (वय ५ वर्षे), नितीन मधे (वय २५ वर्षे) यांच्यासह एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तर अर्चना मधे आणि सुहास मधे गंभीर जखमी झाले आहेत.

रात्री भरधाव पिकअप जीने दोन दुचाकीना उडवले. अपघातात दुचाकीवरून जाणारे प्रवाशी शेतमजूर होते. हे सर्व नारायणगाव येथुन शेतातील कामे आटोपून पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे जात होते. या दरम्यान नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या आठ जणांना चिरडल्याची घटना घडली.

या भीषण अपघातात तीनही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यातील पिकअप जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारासाठी खासगी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.