''कर्नाटकमध्ये भाजपला 60 जागा सुद्धा मिळणार नाहीत''
कर्नाटकची विधानसभा निवडणूक जाहिर झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप 150 जागा जिंकणार असा दावा, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला होती. त्यावर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
बी. एस. येडियुरप्पा यांनी दावा केला होता की भाजप 150 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सिद्धरामय्या म्हणाले, भाजप ६० जागाही जिंकू शकणार नाही. काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणार आहे. दरम्यान, गुब्बी मतदारसंघातील जेडीएस आमदार श्रीनिवास यांनी सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डि. के. शिवकुमार यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश केला. यावेळी सिद्धरामय्या माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, कर्नाटक विधानसभेची निवडणूक बुधवारी जाहीर झाली. राज्यात १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल लागणार आहे. बी. एस. येडियुरप्पा म्हणाले, मी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी वयाची ८० वर्षे ओलांडल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा दिला होता. माझे वय ८० वर्षांपेक्षा जास्त असले तरी मी यावेळीच नव्हे; तर पुढच्या वेळीही राज्याचा दौरा करणार आहे.
या निवडणुकीतच नव्हे; तर पुढच्या निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल, असा दावाही त्यांनी केला. कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. काँग्रेस भ्रष्ट आहे; म्हणूनच ४० टक्के कमिशनचे खोटे आरोप आमच्यावर करत आहे, हा मतदारांचा प्रश्न नाही, असा आरोप येडियुराप्पा यांनी केला होता.
नऊ लाख मतदार प्रथमच करणार मतदान
या निवडणुकीत एकूण पाच कोटी २१ लाख ७३ हजार ५७९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यापैकी २.५९ कोटी महिला, तर २.६२ कोटी पुरुष मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राज्यात एकूण ९.१७ लाख मतदार आहेत, जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यांचे वय १८ ते १९ या दरम्यान आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.