Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेलेश्वर महादेव मंदिरातील विहिरीचे छत कोसळले ,50 हून अधिक लोक पडले पाण्यात

बेलेश्वर महादेव मंदिरातील विहिरीचे छत कोसळले ,50 हून अधिक लोक पडले पाण्यात


मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एक विहीरी वरील छत कोसळून त्या विहिरीत अनेक लोक पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एकाचा मृत्यू झाला आहे. इंदूरचे पोलीस आयुक्त मकरंद देवस्कर घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

इंदूरच्या ठाणे जुनी येथील पटेल नगर येथील शिवमंदिरातील विहिरीचे छत केसळल्याने सुमारे 50 जण विहिरीत पडले आहेत. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि १०८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या नाहीत.

ही घटना घडली त्यावेळी मंदिरात कन्याभोज सुरू होता. या आपघातात काही मुलीही पडल्याचे समोर आले आहे. दुर्घटनेनंतरही पायरीच्या आजूबाजूची जमीन सातत्याने खचत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त मकरंद देवस्कर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात ही घटना घडली. बाल्कनीत लोक बसले होते. यादरम्यान वरील जमीन बुडाली. रामनवमी असल्याने मंदिरात सकाळपासूनच गर्दी होती.

पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह इतर सर्व वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मदत आणि बचाव कार्य तातडीने करण्यात येत आहे. रुग्णवाहिका आणि इतर सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.