गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका, 2 वर्षासाठी वकीलीची सनद रद्द
मुंबई: सध्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टानं मोठा झटका दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची वकीलीची सनद रद्द करण्यात आली आहे. सदावर्ते यांची 2 वर्षासाठी वकीलीची सनद रद्द करण्यात आली आहे.
गोवा कोर्टानं हा निर्णय दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी काळा कोट आणि बँड घालून एसटी महामंडळाच्या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल अधिवक्ता सदावर्ते यांच्यावर बीसीएमजीने शिस्तभंगाची कारवाई सुरू केली होती. सदावर्तेनीं बार कौन्सिल ऑफ इंडियाने बनवलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यानं ही कारवाई केली गेली आहे.
सदावर्ते यांनी जे केलं ते वकिलांच्या कार्यशैलीसाठी ठरवलेल्या नैतिकतेच्या निकषांच्या विरुद्ध आहे. मराठा आरक्षण आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचारी यांच्यातील कायदेशीर लढाईदरम्यान ही घटना घडली होती. त्यामुळं सदावर्ते यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर कोर्टोत सुणावणी सुरु होती.
काहीवेळापूर्वी याचा निकाल देण्यात आला असून गुणरत्न सदावर्ते यांची वकीलीची सनद रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते नेहमीच चर्चेत असतात. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर गोंधळ प्रकरणी सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. सध्या कोर्टाच्या या निकालाला विरोधात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टोत धाव घेतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.