कॉलेजच्या आवारात विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या..
कर्नाटक : कर्नाटक राज्यातील बंगलुरू येथील कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने विद्यार्थीनीवरती चाकू हल्ला केला आहे. हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु विद्यार्थ्याने स्वतःवरही हल्ला केला आहे. त्यामुळे नेमकं कारण काय आहे ? याचा पोलिस शोध घेत आहेत. विद्यार्थी जवळच्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिस त्याची चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रेसीडेंसी कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. विद्यार्थीनी प्रेसीडेंसी कॉलेजची आहे, ती तिथं बीटेकचं शिक्षण घेत होती. तर विद्यार्थी दुसऱ्या कॉलेजमधून बीसीए करीत आहे. ज्यावेळी विद्यार्थ्याने चाकू हल्ला केला. त्यावेळी विद्यार्थीनीसोबत असलेल्या मैत्रीणीने आणि सुरक्षा रक्षकाने तिला रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु डॉक्टरांनी विद्यार्थीला मृत घोषित केलं.
पवन कल्याण या हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थी एकमेकांना ओळखत होते. त्याचबरोबर दोघंही कर्नाटकातील एकाचं गावचे असल्याचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर होण्याची पोलिस वाट पाहत आहेत. त्यानंतर या प्रकरणाचा उलघडा होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.