आधी लैगिक छळ नंतर विष पिण्यास भाग पाडल, १८ वर्षीय तरुणीवर अत्याचार
देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय, वेगवेगळ्या स्तरवर मोठे यश मिळवत आहे पण महिला सुरक्षेचा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही हे ही तेवढचं खरं. महिला असो वा मुलगी, घरी असो वा बाहेर कुठही मोकळ्या पध्दतीने श्वास घेता येईल, न घाबरता निर्भिडपणे जगता येईल अशी कुठलीही जागाचं नाही असं म्हण्टलं तरी हरकत नाही.
वर्षाच्या पहिल्याचं दिवशी राजधानी दिल्लीतून काळीज पिळवटून टाकणारी घटना पुढे आली होती. दिल्ली दुर्घटनेत तर तरुणीचा जागीच कारखाली चिरडून हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या बाजूला १ जानेवारीला असाचं काहीसा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील पिलीभित येथे घडला असुन पिडीत सध्या इस्पितळात मृत्यूशी झुंज देत आहे. तरी या प्रकरणी देखील एकाच कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पिलीभित येथे रहिवाशी असलेली तरुणी १ जानेवारीला काही कामानिमित्त बाहेर गेली होती. दरम्यान २२ वर्षीय नराधम तरुणीस त्याच्या खरात खेचत घेवून गेला. तरुणीस मारहाण केली आणि तिच्यावर लैगिक अत्याचार केले. तरी नराधमाचं घर हे पिडीतेच्या घरापासून काहीच अंतरावर असल्याने पिडीतेच्या आईला आपल्या मुलीचा किंचाळ्या ऐकून आईने ताबडतोब नराधमाचं घर गाठण्याचा प्रयत्न केला. पण तोवर नराधमाच्या कुटुंबियांनी पिडीतेस विष पाजून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि पिडीतेस घराबाहेर फेकून दिलं.
सध्या पिडीतेस पिलीभित येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असुन तिची प्रती गंभीर आहे. डॉक्टर सध्या तरुणीवर उपचार करीत आहेत. तरी नराधम कमल कुमारसह त्याचे कुटुंबिय म्हणजे एकूण सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तरी उत्तर प्रदेश पोलिस या घटनेचा सखोल तपास करीत आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल असं पोलिसांनी पिडीतेच्या कुटुंबियास आश्वस्त केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.