नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिरुपती मंदिरात रेकॉर्डब्रेक दान...
तिरुपती मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. इथे दररोज लाखो रुपयांचे दान जमा होत असते. मात्र यंदा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या मंदिरात रेकॉर्डब्रेक दान झाले आहे. या मंदिराच्या हुंडित पहिल्या दिवशी तब्बल 7.6 कोटी रुपये जमा झाले आहेत.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वैकुंठ एकादशी असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नवीन वर्षाचा पहिला दिवस त्यात वैकुंठ एकादशी व शनिवार रविवार अशी सुवर्णसंधी आल्याने भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. पहिल्या दिवशी जवळपास दहा हजाराहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. 31 डिसेंबरच्या रात्रीपासूनच मंदिराबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या.
साधारणत: दररोज तिरुपती मंदिरात पाच ते सहा कोटींचे दान जमा होते. कोरोना काळाच्या आधीपर्यंत दर महिन्यात मंदिरात 90 ते 115 कोटींचे दान जमा व्हायचे. कोरोना काळात या आकड्यात घट झाली होती. मात्र गेल्या वर्षी एप्रिलपासून पुन्हा एकदा दानाच्या आकड्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 23 ऑक्टोबर 2022 ला 6.3 कोटींचे दान जमा झाले होते. ते आतापर्यंतचे सर्वाधिक दान होते. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आलेल्या दानाने तो रेकॉर्ड मोडला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.