पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली.
सातारा शहराजवळील पुणे-बंगळूर महामार्गावर असलेलल्या पेट्रोल पंपनजीक एका हॉटेलजवळ गोंधळ सुरू होता. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना तेथून जाण्यास सांगितल्याने पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी दोघांनी पलायन केले आहे. सराईत गुन्हेगार अक्षय पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष शेलार असे जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. संतोष शेलार मध्यरात्री गस्त घालत होते. त्यांच्यासोबत उपनिरीक्षक वाघमोडे होते. रात्री दीड वाजता एका हॉटेलजवळ काहीजण गोंधळ घालत होते. दोन्ही पोलिसांनी संबंधितांना शांततेचे आवाहन करुन तेथून निघून जाण्यास सांगितले. तेव्हा, संशयित अक्षय पवार व त्याच्या दोन्ही साथीदारांनी पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. पोलिसांना उद्देशून 'आम्ही कोण आहे? तुम्हाला सोडणार नाही.' असे म्हणत धमकी दिली. यावेळी एका संशयिताने थेट धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.