Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रोजगार मेळाव्यात शंभर विद्यार्थ्यांची कंपनीने केली निवड

रोजगार मेळाव्यात शंभर विद्यार्थ्यांची कंपनीने केली निवड राज्य अध्यक्ष महादेव साळुंखे.


रोजगार मेळाव्यात शंभर विद्यार्थ्यांची कंपनीने केली निवड राज्य अध्यक्ष महादेव साळुंखे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तसेच मराठा स्वराज्य संघाच्या संयुक्त विद्यामानाने मिरज कॅन्सर हॉस्पिटलच्या समोर प्रधानमंत्री कौशल्य केंद्रामध्ये रोजगार मेळावा पार पडला.

 

यामध्ये सांगली जिल्ह्यातून व राज्यातून पंधरा कंपन्याने सहभाग नोंदवला होता 300 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. यातून कंपन्याने त्यांच्या इंटरव्यू   व मुलाखती द्वारे 100 विद्यार्थ्यांची निवड केली. सकाळी दहा वाजता मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव(बापू) साळुंखे व राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांचे हस्ते नारळ वाढवून मुलाखतीस सुरुवात झाल्या.

 

या वेळेला कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी माननीय मोरेश्वर दुधाळ व बिबीशन साबळे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले . या वेळेला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय महादेव(बापू) साळुंखे यांनी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. या वेळेला बोलताना बापू पुढे म्हणाले  गेल्या काही दिवस अनेक कारणामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्या बंद झाल्या त्यामुळे अनेक कंपन्याने कामगार कपात केली त्यामुळे बेरोजगारी वाढले आहे तुम्ही आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थिती नसतानाही,अनुकूल बनवण्याची धमक या नवनवीन तरुण पिढीमध्ये आहे जीवन जगताना या  परिस्थितीमध्ये नउमेद, निराश न होता नेहमी पॉझिटिव्ह अटीट्युड ठेवून व नोकरी करून अनुभवाच्या जोरावर उद्योजक बना आणि तुम्ही इतरांना नोकरी देण्यामध्ये सहभागवा नोंदवावा एवढं मोठे व्हा असं सल्ला दिला व मुलाखती घेण्यासाठी आलेल्या अनेक कंपन्याचे व त्यांच्या प्रतिनिधीचे त्यांनी आभार मानले .यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की आजचा रोजगार मेळावा हा .अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, व मार्गदर्शन केंद्र या सांगलीचे या विभागाचे व जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त माननीय ज. बा करीम साहेब यांच्या नियोजनामुळे आजचा रोजगार मेळावा यशस्वी होत आहे तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास मंडळाचे समन्वयिका सो निशा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो .या वेळेला सांगली शहराचे अध्यक्ष सुधीर चव्हाण, कुपवाड शहराध्यक्ष सत्वशील पाटील, डॉ श्रीकांत भोसले, इरफान पटेल व अनेक संयोजक विद्यार्थी पदाधिकारी व आयोजक उपस्थित होते. व शेवटी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते यांनी केलेल्या नियोजनामुळे त्यांचे आभार मानले.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.