लठ्ठे साहेबांच्या प्रतिमेसमोर सभा नतमस्तक.. जैन समाजाच्या उध्दारकर्त्यांस श्रध्दापूर्वक अभिवादन..!!
दक्षिण भारत जैन सभेचे अध्वर्यू, छ. शाहू महाराजांच्या मराठी व इंग्रजी चरित्राचे सिध्दहस्त लेखक, मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री दिवाण बहादूर आण्णासाहेब लठ्ठे यांची १४४ वी जयंती साजरी दक्षिण भारत जैन सभेने श्रध्दापूर्वक साजरी केली. सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील साहेब आणि चेअरमन रावसाहेब पाटील अण्णा यांच्या शुभहस्ते लठ्ठे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने भक्तीपूर्वक अभिवादन करण्यात आले.
लठ्ठे साहेबांनी अत्यंत निरपेक्ष भावनेने सेवाभावी वृत्तीने जैन समाजाचे नेतृत्व करुन जैन समाजाची चौफेर प्रगती केली. समाजातील अनेक कर्तबगार नेत्यांची फळी उभी करुन समाजात शैक्षणिक क्रांती घडवून समाज प्रबोधनातून जैन समाजाला दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून विकासाचा मार्ग प्रशस्त केला. त्यांचे समाजावर न फिटणारे ऋण आहेत. सभेच्या एकाच छताखाली जैन समाज यावा.. लठ्ठे साहेब आणि सभेच्या कर्तबगार नेत्यांची चरित्रे समाजातील युवा पिढीने वाचली पाहिजेत. असे मत सभेच्या पदाधिकांऱ्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
सभेचे महामंत्री प्रा. बिरनाळे यांनी लठ्ठे साहेबांची कर्तबगारी सांगितली.
लठ्ठे साहेबांची जयंती हा जैन समाजाचा श्वास आहे. अशा या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील साहेब, चेअरमन रावसाहेब पाटील अण्णा,मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, ट्रस्टी जयपाल चिंचवाडे, सभेचे सीईओ योगेश खोत, सुरेश सांगावे, जिनेंद्र बुबनाळे, सुरेश फराटे, दिगंबर आवटी, किरण मगदूम, विशाल भरमगुडे, अक्षय पाटील व भरत चौगुले उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.