Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रात मास्कसक्ती?

महाराष्ट्रात मास्कसक्ती?


हद्दपार झाला म्हणता म्हणता कोरोनानं पुन्हा डोरकं वर काढल्यानं आता आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाल्या आहेत. भारतामध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 145 नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये चीनमधील BF.7 व्हेरियंटचे 4 रुग्ण आहेत. तर जगात चीन, जपान, कोरिया, अमेरिकेत मिळून गेल्या २४ तासांत तब्बल ५ लाख ३७ हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं कोरोना स्थिती काहीशी चिंताजनक वळणावर आल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा धोका पाहता खुद्द पंतप्रधान मोदींनीही देशवासीयांना सार्वजनिक ठिकाणी आणि उत्सव काळात मास्क लावण्याचं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्रातही महत्त्वाच्या सूचना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारही सतर्क झालं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. राज्यात सध्या कोरोनाच्या BF.7 व्हेरियंटचा एकही रूग्ण नसला तरीही परिस्थितीवर आरोग्य यंत्रणा नजर ठेवून असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, येत्या काळात पुन्हा एकदा कोरोनाची पंचसूत्री अंमलात आणण्याचं आवाहन करण्यात आल्यामुळं, कोरोना चाचणी, मास्क वापर, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर या गोष्टींची काळजी घेतली जाणार आहे.

महाराष्ट्रात मास्क सक्ती?

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क असून, इथं दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टनसिंग सह सॅनिटायझरचा वापर करावा, ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घ्यावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी असं सांगण्यात आल्यानंतर कोविडच्या धास्तीने अनेक साईभक्तांच्या चेहऱ्यावर पुन्हा मास्क दिसू लागले आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान अलर्ट मोडवर

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुट्ट्यांदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता आता मंदीर प्रशासनाच्यावतीने ज्या भाविकांकडे मास्क नाहीत त्यांना मास्क मोफत वाटले जात आहेत. तर मंदिर परिसरात मास्क वापरा असे सूचना फलकावर लावून आवाहन करण्यात येत आहे.

कोरोना लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता मास्क वापरण्याचं आणि सलूनमध्ये योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष तुषार चव्हाण यांनी केलंय. पुन्हा लॉकडाऊन होऊ नये, यासाठी सरकार जे काही नियम करेल, त्याचं पालन करा, असंही ते म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.