Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेंदूर फासलेल्या दगडांखाली मृतदेह

शेंदूर फासलेल्या दगडांखाली मृतदेह..


औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज येथे तीन महिन्यांपासून बंद असलेल्या घरात शेंदूर फासलेल्या दगडांखाली एक मृतदेह पुरण्यात आला होता. घराचं कुलूप फोडून पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हा मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून नुसता सांगाडा उरला होता. हा घातपाताचा प्रकार तसेच नरबळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वाळूज येथील समता कॉलनीमध्ये सूर्यकांत गोरखनाथ शेळके यांचं घर आहे. शेळके यांचं दुमजली घर तीन महिन्यांपासून बंद होतं. 7 महिन्यांपूर्वी या घराचा तळमजला भाडे तत्त्वावर एका कुटुंबाला देण्यात आला होता.

फुलंब्री तालुक्यातील धानोरा येथील काकासाहेब भुईगड शेळके यांच्या घरात भाड्याने रहात होता. तो पत्नी आणि दोन मुलींसह या घरात राहत होते. नवरात्रीत भुईगड आपल्या गावी जाणार असल्याचं सांगून गेले. लवकरच भाडं देऊन असं सांगून गेले. पण नंतर त्यांचा फोन बंद येत असल्यानं शेळके एक दिवस घरी धडकले. त्यावेळी कुलूप पाहून शेळके यांना शंका आली. त्यांना 3 महिन्यांपासून घर बंद असल्याचं कळलं. 

जेव्हा घराचं कुलूप फोडून त्यांनी आत पाहिलं तेव्हा ते हादरले. घरातील साहित्य गायब होतं. स्वयंपाक घरातील ओट्याखाली खोदकाम करण्यात आलं होतं. सिमेंट वाळूने ते बंद करण्यात आलं होतं. तसंच त्यावर शेंदूर फासलेले दोन दगड, लिंबू आढळून आले होते. तेथे खोदकाम केल्यावर एक कुजलेला मृतदेह चादरीत गुंडाळून ठेवल्याचं आढळून आलं. भाडेकरु भुईगड यांचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. हा मृतदेह महिलेचा आहे की पुरुषाचा याचंही गूढ कायम असून नेमका हा सगळा प्रकार आहे तरी काय, हे शोधून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.