'सनातन धर्माला मारणे तेही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश'
अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा उल्लेख होता. ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिनं ती डिलीट केली आहे. मात्र पोस्ट डिलीट केल्यानंतरही ती चर्चेत आली आहे. केतकीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती.
त्यात तिनं लिहिलं होतं, “समिती कुठली, कशासाठी निर्माण करण्याचा विचार आला असेल? याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. सनातन धर्माला मारणे, तेही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश. स्वघोषित मावळे तर तसंही माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीरच नव्हे तर घोर अपमान आहे."
“पण आम्ही स्वघोषित असल्याने काहीही करायला मोकळे आहोत.”
पुढे ती म्हणते, “एक मेसेज मिळताच किक मारुन अशुद्ध मराठीत (महाराजांना सहा भाषा अस्खलित येत असत. इकडे मातृ-पितृ भाषेची बोंब असो) आरडाओरडा सुरू. सनातनी हिंदू मारला जात आहे. मालवणी ऑर्लिम, मुंबईमध्ये मुसलमान किंवा क्रिस्ती आहेत. सनातनी हिंदूला घर दिले जात नाही, ही सत्य परिस्थिती मी स्वत: अनुभवली आहे.”
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.