कोल्हापूरचे नवे 'आयजी' सुनील फुलारी
मुंबई : राज्यसतील काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दि. 13 डिसेंबर रोजी काही बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात काही बदल करून बदल्यांचे नवे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आलेले सुनील फुलारी यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांची मुंबईचे सह आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची कारागृह आणि सुधारसेवा पुणे येथे अपर पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांची पुण्याचे अपर पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे रविंद्र शिसवे यांची मुंबई लोहमार्गचे पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. मीरा-भाईंदर - वसई-विरारचे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांची नवी मुंबईतील सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.