दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्या नावावरून गोव्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'मोपा' नाव!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, 11 डिसेंबर 2022 रोजी 'मोपा' या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. या विमानतळाला माजी संरक्षण मंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, या विमानतळामुळे पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल. या विमानतळाची काय खासियत आहे? हे जाणून घ्या
2 हजार 870 कोटी रुपये खर्च
2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाची पायाभरणी करण्यात आली होती. माहितीनुसार, हे विमानतळ तयार करण्यासाठी 2 हजार 870 कोटी रुपये खर्च आला आहे. उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले की, मोपा विमानतळाच्या उभारणीनंतर गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. पंतप्रधान म्हणाले की, 2 विमानतळांमुळे गोव्यासाठी कार्गो हब बनण्याची शक्यता वाढली आहे.
'या' विमानतळाची खासियत काय आहे?
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गोव्याच्या उत्तरेकडील भागात आहे. गोव्याची राजधानी पणजीपासून 35 किमी अंतरावर आहे. मार्च 2000 मध्ये केंद्र सरकारने गोवा राज्य सरकारला मोपा गावात ग्रीनफिल्ड विमानतळ बांधण्याची परवानगी दिली. पहिल्या टप्प्यात, विमानतळाची वार्षिक क्षमता सुमारे 44 लाख प्रवासी आहे, तर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, त्याची एकूण क्षमता वार्षिक 10 दशलक्ष प्रवासी होईल. हे विमानतळ दिसायला खूपच प्रेक्षणीय आहे. जगातील सर्वात मोठी विमानांच्या उड्डाणासाठी धावपट्टीही तयार करण्यात आली आहे.
आलिशान सुविधांनी सुसज्ज विमानतळ
या विमानतळावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आला आहे. यासोबतच ग्रीन बिल्डिंग, एलईडी लाईट, रिसायकलिंग अशा अनेक सुविधा असणार आहे. दाबोलीम विमानतळाच्या तुलनेत मोपा विमानतळ आलिशान सुविधांनी सुसज्ज आहे. या विमानतळावर रात्रीच्या पार्किंगची सुविधा असेल, तसेच दाबोलीममध्ये कोणतेही कार्गो टर्मिनल नव्हते, तर मोपा विमानतळावर 25,000 मेट्रिक टन सामान क्षमतेसह कार्गो सुविधा असेल.
10 प्रमुख गोष्टी
* PM मोदी म्हणाले, "मोपा विमानतळामुळे गोव्यातील पर्यटनाला चालना मिळेल, तसेच कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल.
* हे विमानतळ उत्तर गोव्यातील मोपा येथे 2,870 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. दाबोली येथील विमानतळाव्यतिरिक्त राज्यातील हे दुसरे विमानतळ असेल.
* या विमानतळाची क्षमता पहिल्या टप्प्यात वार्षिक 44 लाख प्रवाशांना सुविधा देण्याची आहे. तसेच संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा वर्षभरात एक कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचेल.
* दाबोलीम विमानतळाची एका वर्षात 85 लाख प्रवाशांची क्षमता आहे, मात्र येथे मालवाहतुकीची सोय नाही. ही सुविधा नवीन विमानतळावर असेल.
* मोपा येथील नवीन विमानतळामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर गोवा हे पूर्वीपासूनच लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
* दिवंगत मुख्यमंत्र्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी यापूर्वी सांगितले होते की, विमानतळाला त्यांच्या वडिलांचे नाव दिल्यास हा आनंदाचा क्षण असेल.
* PM मोदींनी नोव्हेंबर 2016 मध्ये मोपा विमानतळाची पायाभरणी केली होती.
* GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने सांगितले की, या सुविधेमुळे राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.
* या विमानतळावर 3-डी मोनोलिथिक प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
* चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी 5G अनुकूल IT पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.
* जलद चेक-इनसाठी सेल्फ-बॅगेज ड्रॉपचा पर्याय देखील आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.