Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेतील चुकीची अतिक्रमण मोहीम न थांबल्यास उपोषण

मिरजेतील चुकीची अतिक्रमण मोहीम न थांबल्यास उपोषण


येथील छत्रपती शिवाजी रस्त्यातील अतिक्रमण हटाव मोहीम ही चुकीची आहे, त्यामुळे होणारा अन्याय थांबवावा अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा या रस्त्यावरील मिळकतधारक श्रीमती अशालता हेटकाळे व अॅडवोकेट प्रविणा हेटकाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

त्या म्हणाल्या, आम्ही मिरजेतील छत्रपती शिवाजी महराज रोड येथील गावठाण हद्दीतील रहिवासी आहोत. विकास आराखड्याप्रमाणे नियमाप्रमाणे तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी दिलेल्या पत्रानुसार व कायद्यानुसार रस्त्याचे काम करण्यास आमची हरकत नाही. परंतु कायद्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी दिलेल्या पत्रानुसार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे अधिकारी काम करत नाहीत. अनधिकृतपणे अतिक्रमण काढण्याची कारवाई करत आहेत..

रस्त्याचे काम चालू करणेचे अगोदर अधिकाऱ्यांची ड्युटी होती की, प्रथमतः डी. पी. स्कीम व डी. पी. प्लॅन प्रमाणे गावठाण रहिवास व कमर्शियलच्या हद्दी निश्चित करुन मध्य काढणे जरुरीचे होते. त्यानंतर त्या त्या मिळकतीवरती मार्किंग करणे कायद्याने बंधनकारक होते. तसे न करता नागरिकांच्या सामाजिक संस्थेने धुळीमुळे नागरिकांचे आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे आंदोलन सुरु केले.

त्या आंदोलनाला बळी पडून सदरचे काम चालू झाल्यानंतर साम, दाम, याचा वापर करुन तसेच पोलीसांची मदत घेवून छत्रपती शिवाजी महाराज रोडवर असणाऱ्या मिळकतधारकांवरती दबाव यंत्राचा वापर करुन महानगरपालिकेचे अधिकारी बेकायदेशीररित्या सोयीप्रमाणे मार्किंग करुन लोकांच्या मिळकतीत घुसखोरी करुन काही मिळकतधारकांच्या केसीस न्यायप्रविष्ठीत असतानाही मिळकतीची पाडापाडी चालू केली आहे.

राजकीय लोकांना खुश करण्याकरिता

मिळकतधारकांच्या मिळकतीचा कब्जा अधीकारी दांडगाईने घेत आहेत. शासकीय अधिकारी बेकायदेशीरपणे चुकीचे मार्कंग करुन आमचे मिळकतीचे नुकसान करत आहेत. यात पालकमंत्री यांनी जातीने लक्ष घालावे. छत्रपती शिवाजीरोड मिरज येथील अतिक्रमण कारवाई थांबली नाही तर उपोषण करणार आहे, याची नोंद घ्यावी, असेही हेटकाळे यावेळी म्हणाल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.