ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदान केंद्रांच्या परिसरात मनाई आदेश जारी
सांगली, दि. 16, : जिल्ह्यात दि. 18 डिसेंबर 2022 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सर्व मतदान केंद्रांच्या इमारतीपासून २०० मीटर सभोवतालच्या परिसरात मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश दि. 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहतील.
या मनाई आदेशानुसार मतदान केंद्राच्या 200 मीटर सभोवतालच्या परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटा-गटाने फिरण्यास मनाई करण्यात येत आहे, तसेच एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई करण्यात येत आहे. झेरॉक्स मशीन, टेलिफोन बूथ, फॅक्स मशीन, ध्वनिक्षेपक या संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास आणि मतदान केंद्रात मोबाईल पेजर वापरण्यास मनाई करण्यात येत आहे.
हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावत असणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना लागू असणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.