Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या...

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या...

नांगरे पाटील सदानंद दाते, अमिताभ गुप्तांचा समावेश

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने ३० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तर काही अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचाही समावेश आहे. शिंदे फडणवीस सरकारने प्रथमच आयुक्त आणि पोलीस महासंचालकपदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची झालेली बदली. अमिताभ गुप्ता यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बदली करण्यात आली आहे. तर रितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी विनय कुमार चौबे यांची नियुक्ती केली गेली आहे.

मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली गेली आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था ) असलेले विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. विनाय कुमार चौबे यांची या पदावरून बदली झाल्याने या रिक्तपदावर नांगरे पाटील यांची बदली करण्यात आली आहे.

मिलिंद भारंबे यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी पदोन्नती करण्यात आली आहे. ते मुंबईत विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था ) या पदावर होते. यासह मुंबईचे सह पोलीस आयुक्त (वाहतूक) राज वर्धन यांची अप्पर पोलीस महासंचालक (सुरक्षा मंडळ) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. निकेत कौशिक यांची अप्पर पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ) पदी बदली करण्यात आली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह भारतीय पोलिस सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने मंगळवारी सायंकाळी काढले. 

पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख (सीआयडी) अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. पिंपरीच्या पोलिस आयुक्तपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विनयकुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या शाईफेकीमुळे शिंदे यांची बदली झाल्याची चर्चा आहे. शहरातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्व’ये (मकोका) प्रभावी कारवाई करणारे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी (कायदा व सुवव्यवस्था) नियुक्ती करण्यात आली आहे. 

गुप्ता करोनाकाळात पोलिस आयुक्त म्हणून रुजू झाले होते. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख (सीआयडी) अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी प्रशांत बुरडे यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागाचे उपमहानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची मुंबईत बदली करण्यात आली. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक प्रवीण पवार आणि विशेष पोलिस महानिरीक्षक (मोटार परिवहन) सुनील फुलारी यांची बदली करण्यात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.