Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, औषधांचा तुटवडा, कोल्ड स्टोरेज फुल्ल, मृतदेहाचा खच..

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, औषधांचा तुटवडा, कोल्ड स्टोरेज फुल्ल, मृतदेहाचा खच..


मुंबई : 2020, 2021 वर्षात कोरोनामुळे जग होरपळलं. सर्वत्र भितीचं वातावरण होतं. त्यानंतर हळूहळू कोरोनाची लाट ओसरली. आता तर भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचं प्रमाण नाममात्र राहिलं होतं. पण आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळतोय. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर आहे. भारतातही विशेष काळजी घेतली जात आहे.

चीनमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झालाय. आरोग्यव्यवस्था अपुरी पडत आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताटकळत पडले आहेत. एकंदरीत आपत्तीजनक परिस्थिती आहे. चीनमधील कोरोना रूग्णसंख्या पाहता जगभरात सतर्कता बाळगली जात आहे. खबरदारी घेतली जात आहे.

भारतात खबरदारी

चीनमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता भारतातही खबरदारी घेतली जातेय.परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे. जर एखादा रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर त्याचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत.

आज महत्वपूर्ण बैठक

चीनमधील कोरोनाचा उद्रेक पाहता भारतात वेळेतच काही उपाययोजना केल्या जाणार आहेत. भारताची पुढची पावलं काय असतील, त्याची रूपरेषा काय असेल यासंदर्भात आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पार पडतेय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. यात कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

देशात सध्या केवळ 112 लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. एकूण सक्रीय रूणांची संख्या साडेतीन हजारांच्या आसपास आहे. पण ही संख्या कायम राखणं आणि कमी करणं गरजेचं आहे. शिवाय परदेशातून येणाऱ्या लोकांमधून भारतात संसर्ग पसरणार नाही याकडे सरकारचं लक्ष असेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.