शिक्षण मंडळाचा कनिष्ठ लिपिक संदीप नारायण सपकाळ यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने येथे रंगेहाथ पकडले.
सांगली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मंडळाच्या विभागीय कोल्हापूर विभागीय मंडळाकडे शालार्थ वेतन प्रणाली अर्ज मंजूर करण्यासाठी ९० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारणारा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा कनिष्ठ लिपिक संदीप नारायण सपकाळ ( वय ३३, रा.कोल्हापूर, मूळ डफळवाडी , पाटण) यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने येथे रंगेहाथ पकडले.
यातील तक्रारदार यांच्या पत्नीचे नाव शालार्थ वेतन प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मंडळाच्या विभागीय कोल्हापूर विभागीय मंडळाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या कार्यलयातील कनिष्ठ लिपिक संदीप सपकाळ याची काम होण्यासाठी तक्रारदारांनी भेट घेतली.
तेव्हा सपकाळ यांनी पत्नीचे काम मंजूर झाले असून त्याचे मंजुरी पत्र देण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली.आज शिक्षण मंडळ कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या बाह्य मार्गावर तडजोडीची ९० हजार रुपयाची लाच घेत असताना संदीप सपकाळ रंगेहात पकडला. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.