एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार पण.
न्यूयॉर्क : जगातील श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होती. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्विटरवर पोल घेत नेटकऱ्यांना विचारले होते की, ‘मी ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.’ मस्क यांच्या या ट्विटमुळे मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर आता एलॉन मस्क यांनी सीईओपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करत ही मोठी घोषणा केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये, ‘मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरचे सीईओ पद सांभाळण्यासाठी पात्र असा मूर्ख व्यक्ती सापडताच मी लगेच राजीनामा देईन. त्यानंतर मी फक्त सॉफ्टवेअर चालवेल आणि सर्व्हर टीमच्या कामकाजावर लक्ष ठेवेन.’असे लिहिले आहे.
मस्क यांनी 19 डिसेंबर रोजी सकाळी ट्विटरवर पोल करत विचारले होते की, ‘मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.’ या पोलवर 57.5 टक्के लोकांनी मस्क यांनी राजीनामा द्यावा यासाठी मतदान केलं आहे. तर 42.5 टक्के लोकांच्या मते मस्क यांनी राजीनामा देऊ नये. सीएनबीसीच्या मंगळवारी आलेल्या एका अहवालानुसार, एलॉन मस्क ट्विटरच्या नवीन सीईओच्या शोधात आहेत.
एलॉन मस्क यांनी ट्विटरची जबाबदारी स्वीकारून अवघे दोन महिने झाले आहेत. त्यामुळे ट्विटर पोल मस्क यांच्यासाठी निराशाजनक ठरला आहे. सीईओपदाची जबाबदारी स्वीकारून फक्त दोन महिने झाले असताना, नेटकऱ्यांनी त्यांना ट्विटरच्या सीईओ पदावरून हटवण्यासाठी मतदान केले आहे. ट्विटर पोलनुसार, मस्क यांनी सीईओ पदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.