सोनीमध्ये पैलवानाने केला पैलवानाचा खून..
मिरज तालुक्यातील सोनी इथे एका पैलवान तरुणाचा एका पैलवनाने खून केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आकाश उर्फ अक्षय नरुटे (वय 22) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले. याप्रकरणी प्रकाश नरुटे याने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पैलवान उत्तम नरुटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत अक्षय हा गावातील तालमीत सराव करत होता तसेच शेतीही करत होता. गावातीलच पैलवान उत्तम याच्याशी त्याचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.
सोमवारी रात्री तो वाद मिटवण्यासाठी उत्तम अक्षयला मोटारसायकलवरून घेऊन गेला होता. असे गावातील प्रत्यक्षदर्शी लोकांनी प्रकाशला सांगितले होते. मध्य रात्री दोनच्या सुमारास तालमीच्या वस्तादनी मृत अक्षयच्या भावाला प्रकाशला सोनी करोली रस्त्यावरील माळावर अक्षय रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. भावासह त्याच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अक्षयच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून संशयिताचा शोध सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.