Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुबोध भावेचा मोठा निर्णय; 'ऐतिहासिक भूमिका बापजन्मात करणार नाही.

सुबोध भावेचा मोठा निर्णय; 'ऐतिहासिक भूमिका बापजन्मात करणार नाही.


मुंबई : अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेता शरद केळकर मुख्य भूमिकेत असलेला 'हर हर महादेव' या सिनेमावरून खूपच वाद निर्माण झाला होता. थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. परंतु त्यानंतर अनेक संघटनांनी या चित्रपटातबाबत आक्षेप नोंदवला होता. दरम्यान, तब्बल ५ भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हर हर महादेव आता झी मराठी वाहिनीवर दाखवला जाणार असल्याने पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे.

'हरहर महादेव' सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असा दावा छत्रपती संभाजीराजे यांनी काही दिवसांपसूर्वी बोलताना केला होता. संभाजीराजे म्हणाले होते की, ‘नव्याने प्रदर्शित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांत इतिहासाची मोडतोड करण्यात येत आहे. ज्या घराण्याचे आपण नाव सांगतो, जे नाव आणि कर्तृत्व ही आपली अस्मिता आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे विपर्यस्त चित्रण दाखवले तर सहन करणार नाही’. अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

दरम्यान, लवकरच हा सिनेमा टीव्हीवर प्रदर्शित होणार असून, अनेक शिवभक्तांनी याचा पुन्हा एकदा विरोध केल्याचं दिसून येत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काही शिवभक्तांनी सिनेमात शिवरायांची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावेची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान आणि हर हर महादेव या सिनेमावरून सुरू असलेल्या वादावर सुबोधने आपली भूमिका मांडत एक मोठा निर्णय घेतला असल्याचं पाहायला मिळाले.

यावेळी सुबोध भावे म्हणाला, “छत्रपती शिवाजी महाराजांवरील माझं प्रेम आयुष्यभर राहील. त्यांच्या चित्रपटातून मला जे काही मिळालं, ते मी मरेपर्यंत करत राहणार. पण यापुढे ऐतिहासिक चित्रपटातील भूमिका बापजन्मात करणार नाही. आता शूटिंग सुरू असलेला शेवटचा बायोपिक असेल”. असं म्हणत सुबोधने यावेळी सांगितलं आहे. तसेच, सिनेमातील काही दृश्य काढून टेलिकास्ट केले जाईल अशीही माहिती सुबोधने दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.