Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

किरीट सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचीट..

किरीट सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचीट..


भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा माजी नगरसेवक मुलगा नील सोमय्या यांना मुंबई पोलिसांच्या  आर्थिक गुन्हे शाखेनं क्लीन चीट दिली आहे. आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत युद्धनौकेसाठी जमवलेल्या कोंटीवधींच्या निधीचा अपहार प्रकरणी सोमय्या पितापुत्रांविरोधात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याची कबुली मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली आहे. या अहवालाबाबत कोर्टात लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

भारतीय नौदलात महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भंगारात काढण्याऐवजी तिची डागडूजी करून संग्रहालय रूपात जतन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यासाठी भाजप खासदार किरीट सोमय्यांसह त्यांचा पुत्र नील सोमय्यानं पुढाकार घेऊन मुंबईत ठिकठिकाणी लोकाकडून मदतनिधी उभारण्याचा घाट घालत सुमारे 57 कोटींचा निधी जमा केला. मात्र या निधीचा सोमय्या पिता-पुत्रांनी अपहार केल्याचा आरोप करून माजी सैनिक बबन भोसले यांनी 7 एप्रिल 2022 रोजी तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार ट्रॉम्बे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 429, 406 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी सोमय्या पिता-पुत्रांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई सत्र न्यायालयानं यादोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती.

हा मदतनिधी गोळा करताना चर्चगेट स्थानकात 11 हजार 224 रुपये जमा झाले होते. मात्र, त्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही निधी गोळा केला नसल्याचा दावा सोमय्यांच्यावतीनं बाजू मांडताना केला गेला. त्यावर सोमय्यांनी किती रक्क्म गोळा केली त्याचा तपशील द्या?, असे निर्देश न्यायालयानं दिले होते. त्यावर अंदाजे रक्कम सांगता येईल, खरी रक्कम सांगता येणार नाही, असा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला. त्याची दखल घेत विक्रांत बचावसाठी निधी कशाप्रकारे आणि कोठे गोळा करण्यात आला?, त्याबाबत लेखी तपशील देण्याचे निर्देश हायकोर्टानं मुंबई पोलिसांना दिले होते. मात्र पोलीस त्यात अपयशी ठरल्यानं सोमय्या पिता-पुत्रांना अटकेपासून दिलासा दिला होता.

प्रकरण नेमकं काय?

भारतीय नौदलात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भंगारात काढण्याऐवजी तिची डागडूजी करुन संग्रहालय रुपात जतन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यासाठी भाजप खासदार किरीट सोमय्यांसह त्यांचा पुत्र नील सोमय्याने पुढाकार घेऊन मुंबईत ठिकठिकाणी लोकांकडून मदतनिधी उभारण्याचा घाट घालत सुमारे 57 कोटींचा निधी जमा केला होता. याच निधीत अपहार केल्याचा आरोप कर माजी सैनिकानं तक्रार नोंदवली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.