Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार बरखास्त करा - प्रा प्रमोद इनामदार

राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार बरखास्त करा - प्रा प्रमोद इनामदार


आज मिरज मार्केट परिसरातील महाराणा प्रताप चौकात राज्यातील खोके सरकाराच्या विरोधात नागपूर हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ,जयंतराव पाटील साहेब यांना अधिवेशन होईपर्यंत निलंबित केले आहे ,,याचा निषेध म्हणून मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अध्यक्ष प्रा, प्रमोद इनामदार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील खोके सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला,,

ईडी सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय,, आ, जयंतराव पाटील यांच्यावरील यांच्यावरील निलंबराची कारवाई मागे घ्या , आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, राज्यातील निर्लज्य सरकारचा जाहीर निषेध,, अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष,,प्रा,प्रमोद इनामदार कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर, विधानसभा युवक चे अध्यक्ष महादेव सावंत, उपाध्यक्ष सुनील कबाडगे, फारुख मुजावर ,कृष्णा वायकुळे, संदीप जाधव ,शब्बीर मुल्ला ,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष श्रीमती चंपाताई जाधव ,जिल्हा उपाध्यक्ष अनिताताई कदम, युवती अध्यक्षा सौ स्मिता पाटील ,सौ जुबेदा भाभी मुजावर ,सौ जुबेदा भाभी मुजावर सौ सुप्रिया तोडकर, सौ कौसर मुजावर, सौ,अश्विनी उपाध्ये ,सौ, अश्विनी पाटील  असे मिरज तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते श्री गंगाधर तोडकर यांनी आभार मानले


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.