सांगलीत डॉक्टरची गळफासाने आत्महत्या..
शहरातील विश्रामबाग परिसरातील सत्यसाईनगरमध्ये राहणाऱ्या डॉक्टरने स्वतःच्या ओपीडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. संपत विलास पाटील (वय ५१ रा. विश्रामबाग, सांगली) असे मृताचे नाव आहे. याची नोंद संजयनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. डॉक्टरांच्या पत्नीने दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी पोलिसांना मिळाली आहे. डॉ. संपत पाटील हे विश्रामबाग परिसरातील सत्यसाईनगरमधील एका दूध डेअरी समोर राहत होते. याच ठिकाणी त्यांची एका खोलीत ओपीडी होती.
दहा वर्षांपूर्वी संपत पाटील यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची मुलगी परगावी शिक्षण घेत आहे. डॉ. पाटील सांगलीत एकटेच राहत होते. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाटील यांनी ओपीडीच्या पाठीमागे असणाऱ्या एका खोलीत दोरीने छताच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. संजयनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. डॉ. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी पोलिसांना सापडली आहे. त्यात माझ्या आत्महत्येला कोणासही दोषी धरू नये असा मजकूर असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी सांगितले. या घटनेची नोंद संजयनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.