Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत बदली झालेल्या अधिकाऱ्यांना त्यांचे सहकारी चिडवत असल्याची चर्चा..

सांगलीत बदली झालेल्या अधिकाऱ्यांना त्यांचे सहकारी चिडवत असल्याची चर्चा..


सांगली :  सांगलीत काम करून बदली झालेल्या अधिकाऱ्यांना त्यांचे सहकारी चिडवत असल्याची चर्चा आहे. सांगलीत ओली केलेली कपडे गावी नेऊन सुकवलीस असे टोमणे जिल्ह्यातून बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांना ऐकावे लागत आहेत. सहकारी अधिकारीच असे बोलत असल्याने त्यात तथ्य असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी विविध विभागात काम केले आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्याने तसेच पदोन्नती झाल्याने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र बदली होऊन गेलेल्या अधिकाऱ्यांना सहकारी अधिकाऱ्यांचे टोमणे ऐकावे लागत आहेत. सांगलीत किती कपडे कुठे कुठे भिजवली आणि ती गावी नेऊन कशी सुकवली याचे सुरस किस्से ऐकायला मिळत आहेत.

बदली होऊन गेलेल्या अधिकाऱ्यांनी क्रीम पोस्टिंग कशी मिळवली त्यातून किती कपडे भिजवली असे संबंधित अधिकाऱ्यांचे सहकारी खासगीत बोलत आहेत. फक्त कपडे भिजवल्याचीच नव्हे तर ती गावी शेतात, घरात तसेच अन्य ठिकाणी कशी सुकवली याच्याही सुरस कथा ऐकायला मिळत आहेत.

सांगलीत कपडे भिजवणारे अधिकारी त्यावेळी आपल्या याच सहकाऱ्यांना मात्र सांगलीत येऊ नका, इथे काहीच 'राम' नाही असे सांगत होते. त्याचवेळी ते मात्र कुबेराच्या छत्रछायेखाली होते. म्हणूनच बदलून गेलेल्यांना ते सतत ओली कपडे सुकवण्यावरून बोलत असतात. आता सांगलीत कपडे ओली करून फक्त गावीच नाही तर अन्य कुठे कुठे ती वाळवली याची चर्चा या अधिकाऱ्यांमध्ये सुरूच आहे. ओली कपडे गावी सुकवणारे मात्र हसून तो विषय टाळत असल्याचीही चर्चा आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.