Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्तव्यात कसूर, प्रांताधिकारी, तहसीलदार निलंबित

 कर्तव्यात कसूर, प्रांताधिकारी, तहसीलदार निलंबित




गौण खनिजासंदर्भात कारवाई करताना कर्तव्यात कसूर केल्याने कर्जतचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ही कारवाई करण्यात.या कारवाईमुळे कर्जत व जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यातील माळढोक अभयारण्यासह कर्जत, जामखेड तालुक्यातील पर्यावरणाची हानी होत असल्याने महसूल प्रशासनाने दोन्ही तालुक्यांतील खडीक्रशर बंद ठेवले होते; परंतु काही दिवसांपूर्वी प्रांताधिकाऱयांनी या खडीक्रशरवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई केल्याने खडीक्रशर सुरूच असल्याचे समोर आले.याच अनुषंगाने दोषी प्रांताधिकारी व तहसीलदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषदेत केली होती. त्यानुसार दोघांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.