Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी...


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शरद पवार अधिवेशनासाठी दिल्लीला गेले आहेत.

शरद पवारांचा काल (सोमवारी, 12 डिसेंबर) वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी पवारांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुंबईतीलशरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील घरी एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. या व्यक्तीनं फोन करून पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबई देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन ठार मारणार असल्याचं धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिनं फोनवर म्हटलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मलबार हिल परिसरात सिल्वर ओक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान आहे. याच सिल्वर ओकवर आज (मंगळवारी) एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. फोनवर बोलणाऱ्या अज्ञात इसमानं शरद पवारांना जीवे मारणार असल्याची धमकी दिली. शरद पवारांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्यातक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.