Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रवाशांना लुटणारी आंतरराज्य टोळी जेरबंद..

प्रवाशांना लुटणारी आंतरराज्य टोळी जेरबंद..


विटा: नोव्हेंबर महिन्यात विटा पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल होते. या दोन्ही घटनांमध्ये दोन महिलांना अज्ञात चोरट्यांनी लुटले होते. या दोन्ही गुन्ह्यांच्या अनुशंगाने विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाचे आदेश दिले होते. त्यांच्या पथकाला ७ डिसेंबर रोजी गस्त घालत असताना काही महिला विटा बस स्थानकावर संशयितरित्या वावरत असल्याचे आढळून आले. या पथकाने त्या महिलांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली इतकेच नव्हे तर त्यांनी खोटी नावे सांगितली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हयांची कबुलीही दिली. 

बसमधून प्रवास करणाऱ्या लोकांना लुटणारी आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात आले. तांत्रिक तपास करत टोळीला अटक केल्याचे विटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. आर. ईश्वरी (वय २८) आणि एम. दिपा (वय २२, रा. दोघीही रा. टूमकुर, कर्नाटक, सध्या रा. तासवडे ता. कराड) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील ९ लाख ५१ हजार ३५० रुपये किंमतीचे १७९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

या महिलांनी चोरलेले सोन्याचे दागिने हे तासवडे टोलनाका (ता. कराड) येथील भाड्याच्या घरात ठेवल्याची कबुली दिली. नंतर त्यांच्याकडून ५ तोळे ५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, ५ तोळेचा सोन्याचा हार, १ तोळे वजनाचे झुमके व टॉप्स, ७ ग्रॅमच्या लहान मुलीच्या दोन बांगडया, ६ ग्रॅमची गणपती चे पेंडन्ट असलेली सोनसाखळी आणि सोन्या च्या ३ अंगठ्या असे एकूण ९ लाख ५१ हजार ३५० किंमतीचे १७९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे, अमरसिंह सूर्यवंशी सुरेश भोसले, हणमंत लोहार, मनिषा खाडे, सुषमा देसाई, जयश्री होळकर यांच्या पथकाने केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.