Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अविश्वास ठराव आणायलाच हवा होता तर. चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान

अविश्वास ठराव आणायलाच हवा होता तर. चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान


नागपूरः हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची महाविकास आघाडीची तयारी सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र यावर खरपूस टीका केली आहे. अविश्वास ठराव आणायचाच होता तर तो पहिल्या दिवशी आणायला पाहिजे होता. शेवटच्या दिवशी ठराव आणणं म्हणजे फुसका बॉम्ब आहे. तसेच या ठरावाला फार मतं मिळतील, अशीही शक्यता कमी आहे. कारण आमच्याकडेच 20 ते 25आमदार पुन्हा येणार आहेत. 184 च्या वर मतदान होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी दर्शवला.

हिवाळी अधिवेशात विरोधी पक्ष नेत्यांनी राजकीय विषयांवर भाष्य केलं. पण अखंड महाराष्ट्राचा विकास कसा होईल, सरकारकडून काय मिळेल, विदर्भातून काय मिळेल, मराठवाड्यातून काय मिळेल, यावर बोलले नाही.. विरोधक केवळ टाइमपास करतात, वेळ खराब करतात, दुतर्फी भूमिका मांडतात, विधान परिषदेतही एकमत नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अविश्वास ठरावावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन बसतात, अशी बोचरी टीका बावनकुळे यांनी केली.

बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, ‘ अडीच वर्ष उद्धव यांच्या सरकारने योग्य काम केलं नाही.. धानाचं बोनस मिळावा म्हणून नाना पटोले यांनी अडीच वर्ष अजित पवारासमोर नाक रगडलं, पण हाती काहीच मिळालं नाही.. कर्नाटकचे काँग्रेस अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी सीमावादावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राला कर्नाटकची एक इंच जागाही देणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. यावरून बावनकुळे यांनी काँग्रेसवरच प्रश्न उपस्थित केलाय. कालपर्यंत विरोध पक्ष भाजपवर टीका करत होते. आता काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार यांचा निषेध करणार का? काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे बावनकुले म्हणालेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.