ऐन निवडणुकीत एक्साईजचे ग्रामीणचे अधिकारी..
सांगली : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या आदल्या दिवशी तसेच मतदानादिवशी ग्रामीण भागात ड्रआय डे घोषित करण्यात आला आहे. पण याच निवडणुकीच्या काळात सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी, कर्मचारी यांना गोवा राज्याच्या हद्दीवरील तपासणी नाक्यावर ड्युटी देण्यात आली आहे.
संवेदनशील असलेल्या या निवडणुकीसाठी शनिवारी आणि रविवारी ग्रामीण भागातील सर्व दारू दुकाने, बिअर बार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय निकालादिवशी तालुका ठिकाणचे सर्व दारू दुकाने, बिअर बार बंद ठेवण्याचे आदेश त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक ग्रामीण भागात होत असल्याने ती नेहमीच चुरशीची होत असते. यावेळी उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांच्याकडून साम, दाम, दंड, भेद याचा वापर केला जातो. निवडणूक काळात अनुचित प्रकार होऊ नयेत म्हणून शासनाने तीन दिवसांचा ड्राय डे जाहीर केला आहे.
पण याच काळात ग्रामीण भागातील राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी, कर्मचारी जर जिल्हा सोडून गोवा राज्याच्या हद्दीवर कर्तव्य बजावणार आहेत. या काळात त्यांच्या हद्दीत बेकायदा दारू विक्री झाल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या गोवा हद्दीवरील ड्युटीबाबत फेरविचार करण्याची गरज आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.