Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दोन मुलांनीच केला वडिलांचा खून

दोन मुलांनीच केला वडिलांचा खून 



पुणे :  वडीलांचे महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने पोटच्या दोन मुलांनीच वडीलांचा खून केला. खून करून दृश्यम चित्रपटातील कथेप्रमाणे या दोघांनी मृतदेहाची विल्हेवाटही लावली. याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. धनंजय असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुजित आणि अभिजित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चाकण औद्योगिक क्षेत्रात धनंजय यांचा फरसाण विक्रीचा व्यवसाय असून ते कुटुंबासमवेत रहात होते. 

धनंजय यांचे नागपूर येथील महिलेशी सोशल मीडियाद्वारे ओळख होऊन दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले. धनंजय यांच्या विवाहबाह्य प्रमेसंबंधांची माहिती समजल्यानंतर घरात पत्नी आणि मुलांसोबत त्यांचे वाद होऊ लागले. त्यामुळे आपली मुले आपला घातपात करून जीवे ठार मारतील, अशी शंका  त्यांनी प्रेयसीस बोलून दाखवली होती.

दरम्यान, धनंजय हे बेपत्ता असल्याबाबत तपास करताना पोलिसांना त्यांच्या प्रेयसीबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. त्यामुळे धनंजय यांच्या दोन मुलांनी १५ डिसेंबरच्या रात्री त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह कंपनीच्या भट्टीत टाकला व तो पूर्णपणे जाळला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.