Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा १.४७ तासांचा; रोड, रेल्वे अन् मेट्रो सगळीकडे हजेरी

पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा १.४७ तासांचा; रोड, रेल्वे अन् मेट्रो सगळीकडे हजेरी


नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ डिसेंबर रोजीच्या नागपूर दौऱ्यानिमित्त सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अजून नेमका कार्यक्रम आला नसला तरी पंतप्रधान रस्तेमार्गाने थेट मेट्रोच्या फ्रीडम पार्कला भेट देऊ शकतात.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. तसेच नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसलादेखील हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. कामठी मार्ग व सेंट्रल एव्हेन्यू या दोन्ही मार्गांवरील मेट्रो मार्गाचेदेखील उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मिहान परिसरातूनच हे सर्व लोकार्पण करण्याच्या दृष्टीने अगोदर हालचाली सुरू झाल्या होत्या.

समृद्धीची स्वतः करणार पाहणी

सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी समृद्धी महामार्गावर जातील. तेथे पाहणी केल्यानंतर ते मिहान परिसरातील कार्यक्रमस्थळी येतील. तेथे अधिकृत लोकार्पण होईल. त्यांचा दौरा हा १ तास ४७ मिनिटांचा असण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूचनांनुसार नियोजनात बदल

सुरक्षा यंत्रणेला आलेल्या सूचनांनुसार आता नियोजनात बदल झाला आहे. पंतप्रधान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर तेथून रस्तेमार्गाने थेट नागपूर रेल्वेस्थानकावर जातील. तेथे ते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवतील. त्यानंतर ते झीरो माईल मेट्रो स्थानकावर जातील व फ्रीडम पार्कची पाहणी करतील. यानंतर ते मेट्रोने थेट खापरी मेट्रो स्थानकावर पोहोचतील.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.