Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'भगवे कपडे घातलेल्या स्वामींनी मुलींवर बलात्कार केलेला चालतो, पण...'; प्रकाश राजच्या ट्विटने वाद तापला!

'भगवे कपडे घातलेल्या स्वामींनी मुलींवर बलात्कार केलेला चालतो, पण...'; प्रकाश राजच्या ट्विटने वाद तापला!


मुंबई  : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान 4 वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहरुख आमि दीपिका यांचा पठाण हा सिनेमा येत्या 30 डिसेंबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्याआधी सिनेमाचा ट्रेलर आणि काही गाणी प्रदर्शित झाली आहेत. सिनेमा प्रदर्शित होण्याआघीच पठाण बायकॉट करण्याची मागणी केली जात आहे. अशातच सिनेमातील 'बेशरम रंग' हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं. या गाण्यात दीपिका आणि शाहरुख यांचा रोमान्स पाहायला मिळत आहे.

दीपिकाच्या बोल्डनेसनं सर्वांना खिळवून ठेवलं आहे. पठाण बायकॉट करण्याची मागणी सुरू होत असताना आता त्यात सिनेमातील गाण्यामुळे आणखी एक वाद निर्माण झाला आहे. गाण्यात दीपिकानं घातलेल्या बिकिनीवरून आक्षेप घेण्यात आला आहे. दरम्यान अभिनेता प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

प्रकाश राज यांनी बेशरम या चित्रपटातील बोल्ड गाण्यावरुन एक ट्विट केलं आहे. ते सध्या व्हायरल झालं आहे. काय आहे प्रकाश राज यांची प्रतिक्रिया, '#बेशरम. जेव्हा भगवा पोशाख परिधान करून बलात्कारी पुरुषाच्या गळ्यात हार घालतात, त्याचा सन्मान करतात, भगवा पोशाख घालून आमदार द्वेषपूर्ण भाषण करतात, हेच आमदार दलाली करतात, भगवा घातलेले लहान मुलींवर अत्याचार आणि बलात्कार करतात, तेव्हा तुम्हाला भगवा चालतो.

पण चित्रपटामधील भगवे कपडे चालत नाहीत? #सहज विचारलं.' दीपिका पादुकोणच्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी पठाणमध्ये तिनं सर्वाधिक बोल्ड सीन्स दिल्याचं म्हटलं जात आहे. दीपिकाला तिच्या बोल्ड सीन्स मुळे ट्रोल केलं जात असताना आता तिच्या बिकिनीच्या रंगावरूनही मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बेशरम रंग गाण्यात दीपिकानं भगल्या रंगाचा बिकिनी ड्रेस घातला आहे.

या ड्रेसच्या हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी आक्षेप नोंदवला आहे. भगव्या रंगाचे कपडे अश्लिल पद्धतीने घातले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पठाण सिनेमात भगव्या रंगाचा झालेला अपमान हिंदुस्तान सहन करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.