पतसंस्था क्षेत्रात कर्मवीर पतसंस्थेने माईलस्टोन गाठला ८०० कोटी ठेवीचे उद्दीष्ट वेळेपुर्वी केले पुर्ण. हे सभासदांच्या विश्वासाचे प्रतिक. :- श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील
सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली ने सभासदांच्या विश्वासाच्या बळावर उत्तुंग भरारी घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक नावाजलेली पतसंस्था म्हणून संस्थेचा नावलौकीक आहे. मार्च २०२२ नंतर ठेवीत तब्बल १४३ कोटीची वाढ करीत आज रोजी ८०० कोटीचे ठेव उद्दीष्ट गाठले असून ठेवीत २२ टक्केने वाढ झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली.
संस्थेने आदर्श व्यवस्थापन ठेवून त्याद्वारे विविध योजना राबविल्या आहेत. त्याला संस्थेच्या सर्व सभासदांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. विविध ठेव व कर्जाच्या योजनेच्या माध्यमातून सभासदांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न संस्था सातत्याने करीत आहे. संस्थेने आपल्या कार्यात जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सभासदांना आधुनिक सौजन्यपुर्ण सेवा देण्याचा संकल्प केला आहे.
८०० कोटी ठेवीचा विश्वास सोबत घेऊन आम्ही सभासदांच्या व संस्थेच्या हिताच्या आणखी चांगल्या योजना राबवू असा संकल्प संचालक मंडळाने बोलून दाखविला. त्यासाठी शाखा विस्तार व कार्यक्षेत्र विस्ताराचे धोरण संचालक मंडळाने घेतले आहे.
संस्था भक्कम आर्थिक पायावर उभी आहे. संस्थेच्या ठेवी ८०२ कोटी कर्ज वाटप ५६७ कोटी गुंतवणूक ३०३ कोटी वसुल भागभांडवल २७ कोटी ५० लाख स्वनिधी ७५ कोटी ३२ लाख व संस्थेचे खेळते भांडवल ९५० कोटी आहे. संस्था आधुनिक बँकींग सुविधा देत आहे. संस्थेला सतत ऑडीट वर्ग अ आहे.
सध्या संस्था ५६ शाखांच्या माध्यमातून सभासदांच्या सेवेत अविरत कार्यरत असून संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हे आहे. संस्थेला तिच्या कार्यासाठी विविध संस्थाकडून अनेक वेळा आदर्श पतसंस्था म्हणुन सन्मानित करण्यात आले आहे. संस्था विविध सामाजिक कार्यातही नेहमी अग्रेसर आहे. संस्थेने ८०० कोटी ठेव उद्दीष्ट पूर्ती निमित्त सर्वांसाठी नववर्षानंद ठेव योजना जाहीर केली असून २३ डिसेंबर ते ७ जानेवारी २०२३ पर्यंत ठेव ठेवणाऱ्या नागरीकांना ९४ व जेष्ठ नागरीकांना ९.२५ % परतावा मिळणार आहे. असेही चेअरमन रावसाहेब पाटील यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक अॅड. एस.पी. मगदूम, डॉ. रमेश ढबू, ओ.के. चौगुले, वसंतराव नवले, डॉ. एस. बी. पाटील (मोटके ) डॉ. चेतन पाटील संचालिका भारती चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र खाडे श्री. लालासाहेब थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांचे सह संस्थेचे सर्व अधिकारी हजर होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.