Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

त्याच्या ताब्यांतून 80 लाखांच्या बनावट नोटा जप्त


मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 10 ने बनावट नोटा जवळ बाळगणाऱ्या एकाला अटक केली आहे. त्याच्या ताब्यांतून 80 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.



भूषण पाटील असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बनावट नोटा घेऊन एकजण येणार असल्याची मोहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली. माहिती मिळताच मुंबईतील पवई येथील आंबेडकर गार्डनजवळ, साकीविहार रोड येथे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. यावेळी एक व्यक्ती दुचाकीवरून (एमएच 48 एझेड 1576) लाल रंगाच्या बॅगसह पवई येथे संशयीतरित्या उभा असल्याचे दिसून आले. यावेळी पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असलेली बॅग तपासली. यावेळी बॅर्गेत 500 रूपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा असल्याचे निर्दशनास आले.

यावेळी पोलीसांनी अधिक तपासणी केली असता 500 रूपयांच्या नोटांचे 160 बंडल आढळून आले. या प्रत्येक बंडलमध्ये 500 रूपयांच्या 100 नोटा अशा एकूण 16000 नोटा आढळल्या. भूषण पाटील या संशयित आरोपीविरोधात बनावट नोटा बाळगणे, त्या चलनात आणण्याचा प्रयत्न कैल्याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्याला 4 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.