Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी 2 जानेवारी पर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन

 जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी 2 जानेवारी पर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन



सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : शालेय जिल्हास्तरीय युवा महोत्सव सन 2022-2023 चे आयोजन दि. 3 जानेवारी 2023 रोजी कस्तुरबाई महाविद्यालय कॉलेज सांगली येथे होणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज  दि. 2 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंतच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या dsosport_sangli@rediffmail.com या मेलवर सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करताना त्यावर व्हॉटसॲप नंबर असणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे. युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींचा सहभाग होत असतो. जिल्हास्तरावर लोकनृत्य-Folk Dance मध्ये एकूण सहभागी संख्या 20 आहे तर लोकगीत-Folk Song मध्ये सहभागी संख्या 10 आहे. स्पर्धकांनी दि. 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता कस्तुरबाई महाविद्यालय कॉलेज सांगली या ठिकाणी दोन फोटो, आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला घेवून उपस्थित रहावे. स्पर्धकाने नाव नोंदणी करताना प्रवेशासोबत आपले आधार कार्ड व जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. यासाठी शाळा / महाविद्यालय ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. कोणत्याही स्पर्धकास ऐनवेळी स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार नाही. दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त कोणत्याही स्पर्धकास सादरीकरणाची परवानगी देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी व दिलेल्या वेळेतच सादरीकरण करावे. परीक्षणाबाबत कोणताही आक्षेप घेता येणार नाही. प्रतिस्पर्धी कलाकारांबाबत काहीही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यानिशी त्याचवेळी आक्षेप सिध्द करणे आवश्यक राहील. कलाकारांना कला सादर करताना कोणत्याही प्रकारची इजा / दुखापत झाल्यास त्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या स्पर्धात्मक बाबीतून विजयी होणारे स्पर्धक हे विभागस्तर युवा महोत्सव स्पर्धेसाठी पात्र ठरतील. अधिक माहितीसाठी प्रा. श्री. वडमारे, सांगली मो.नं. 9423036091, श्री. रवी पवार,  विटा मो. नं. 9657091000/ 9175283887, क्रीडा अधिकारी एल. जी. पवार मो.नं. 9422424185 यांच्याशी संपर्क साधावा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.