ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 मतदानाच्या दिवशीचे आठवडा बाजार 19 डिसेंबरला भरविण्याचे आदेश
सांगली, दि. 16, : सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022 चे मतदान रविवार, दि. 18 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. मतदानाच्या दिवशी 32 गावात आठवडा बाजार भरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात एकत्र जमाव गोळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदाना दिवशी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता मतदान प्रक्रिया सुस्थितीत पार पाडण्याकामी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मार्केट ऍन्ड फेअर्स ऍक्ट 1862 (सन 1862 चा मुंबई कायदा क्रमांक 4) च्या कलम 5 व 5 अ, अन्वये प्राप्त अधिकारानुसार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक -2022 रविवार, दि. 18 डिसेंबर 2022 रोजी भरविण्यात येणाऱ्या 32 गावांचे आठवडा बाजार व या गावांव्यतिरिक्त दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान असणाऱ्या इतर कोणत्याही गावात / ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार भरत असल्यास सदर आठवडा बाजार पुढे ढकलण्यात येवून ते सोमवार, दि. 19 डिसेंबर 2022 रोजी भरविण्याचे आदेश दिले आहेत.
मतदानाच्या दिवशी दि. 18 डिसेंबर 2022 रोजी बाजार असलेल्या तालुकानिहाय गावांची माहिती पुढीलप्रमाणे. मिरज – बेडग, सिध्देवाडी, टाकळी (सुभाषनगर), दुधगांव, बुधगांव. तासगाव – वायफळे, सावर्डे, नेहरूनगर. कवठेमहांकाळ – कुकटोळी, खरशिंग. जत – दरीबडची, जालीहाळ बुद्रुक, काराजनगी, वज्रवाड, सोरडी, उमदी. खानापूर-विटा – भाळवणी. आटपाडी - दिघंची, खरसुंडी. कडेगाव - शाळगाव, खेराडे-वांगी, वाळवा - शिगांव, बहादूरवाडी, जुनेखेड, येडेमच्छिंद्र, ओझर्डे, ऐतवडे खुर्द, नागांव, उरूण-इस्लामपूर. शिराळा – शेडगेवाडी, सागांव, टाकवे. या गावांचे आठवडा बाजार पुढे ढकलण्यात येवून ते सोमवार, दि. 19 डिसेंबर 2022 रोजी भरविण्याचे आदेश दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.