सुशांतसिंह राजपूत ची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यूचं कारण अखेर समोर...
सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. दिशा सालियनचा मृत्यू अपघाती झाल्याचं सीबीआय तपासात निष्पन्न झाल्याची माहिती मिळत आहे. सुशांतसोबत 28 वर्षीय दिशाने काही काळ काम केलं होतं. सुशांतचा मृतदेह सापडण्याआधी पाच दिवस तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सीबीआयने सुशांतच्या मृत्यूप्रकरणासह दिशाच्या मृत्यूचाही तपास केला.
अखेर सीबीआय तपासात दिशाचा मृत्यू अपघातीच असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती आहे. 8 जूनच्या रात्री दिशाने एक पार्टी आयोजित केली होती. त्यात ती मद्यधुंद अवस्थेत 14 व्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून खाली कोसळली असं सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे.
दरम्यन जेव्हा दिशाचा मृत्यू झाला तेव्हा दिशाची आत्महत्यानसून हत्या असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला होता. पण सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिशावर हल्ला करून तिचा खून झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाहीतर, दिशा आणि राजपूतची चॅट्सही तपासण्यात आले. त्यामध्ये देखील काही विशेष आढळलं नसल्याची माहिती सीबीआय तपासातून समोर आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.