Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साहित्यरत्न, सत्यशोधक डाॅ.आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेच सांगली महानगरपालिकेत अनावरण

साहित्यरत्न, सत्यशोधक डाॅ.आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेच सांगली महानगरपालिकेत अनावरण


जगविख्यात साहित्यिक साहित्यरत्न सत्यशोधक डाॅ.आण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा सांगली महानगरपालिकेत महापौर दालनात महापौर मा. दिग्विजय सूर्यवंशी व उपमहापौर मा.उमेश पाटील यांना समस्त बहुजन समाजाच्या वतीने भेट दिली. जगविख्यात साहित्यिक सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहे. म्हणून सर्व बहुजन समाजाने मिळून जिल्हाच्या मुख्य ठिकाणी असलेल्या सांगली महानगरपालिकेत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा महापौर दालनात बसविण्याचे ठरविले.

महापौरांनी सुद्धा या गोष्टीचे महत्व जाणून लगेच होकार दिला. महापौर साहेबांचा दालनात मोठ्या संख्येने सर्व पक्ष व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  स्वागत मा.अर्जून कांबळे यांनी केले.  कार्यक्रम प्रास्ताविक मा.किरणराज कांबळे यांनी केले तर आभार मा.कुमार वायदंडे यांनी मानले.

या कार्यक्रमाचे सर्व नियोजन फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्व मा.आकाश तिवडे (मेजर) यांनी केली.  या प्रतिमेचा अनावरणास  दलित मित्र मा.अशोक पवार सर, प्रा. जगन्नाथ मोरे सर, नगरसेवक मा.शेडजी मोहिते, नगरसेवक मा. जगन्नाथ दादा ठोकळ,नगरसेविका मा.अप्सरा ताई वायदंडे, समाज सेवक मा.संजय कांबळे,सामाजिक कार्यकर्ते मा.अमर निंबाळकर, मा.किरणराज कांबळे (आमदार),काँग्रेस युवा नेते मा.विजय आवळे, ब्ल्यू पॅंथर संस्थापक डाॅ.नितीन गोंधळे,सामाजिक कार्यकर्ता मा.लिना यादव मॅडम, पास्टर मा. सावंता माने साहेब,भाजपा युवा नेते मा.अर्जून मजले,भाजपा ओ बी सीचे नेते मा.कय्युम शेख,युवा नेते मा.गणेश वायदंडे,राष्ट्रवादी नेते मा.सचिन केंचे, मा.राजू मामा सव्वाशे,भाजपा युवा नेते मा.अक्षय कांबळे,मा.राहुल वायदंडे, मा.किरण देवकुळे, मा.विजय कांबळे ,मा.मिलिंद बनसोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.