खासदार उदयनराजे भोसले आक्रमक..
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारे विकृत आहेत. अशा विकृत लोकांना पक्षातून काढून टाकले पाहिजे. आपल्या शरीराला गँगरीन झाल्यावर ज्याप्रमाणे आपण शरीराचा भाग कापून काढतो, तसेच त्रिवेदी आणि कोश्यारी यांना पक्षातून बाहेर काढले पाहिजे अशी जळजळीत टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
वसईत मराठा उद्योजक लॉबीच्या वर्धापन दिनासाठी उदयनराजे उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय समाजकार्य आणि राजकीय वाटचालीला सुरुवात करत नाही. राज्यपालपद हे सन्मानाचे पद आहे. त्यामुळे आपण काय बोलतो हे कोश्यारींना कळायलाच हवे. त्यांनी हे एकदा नव्हे तर दोनदा केले आहे.
तो कोण कुठला थर्ड क्लास भिकारडा सुधांशू त्रिवेदी? असे विकृत लोक शिवाजी महाराजांविरुद्ध बरळत असतात. या दोघांनाही छत्रपती शिवरायांची माफी मागायला लावा आणि पदावरून, पक्षातून काढून टाका अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार आहे. अन्यथा माझी पुढची वाटचाल काय असेल ते मी त्यावेळी सांगेन, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.