बापू समलेवालेसह सहाजणांवर गुन्हा दाखल..
महिलेचा शारिरिक मानसिक छळ करून विनयभंग
सांगली: शहरातील विश्रामबाग परिसरातील एका महिलेचा तिचा पती, सासू, सासरा यांच्यासह सहाजणांविरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय संशयितांविरोधात विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये क्रीडा प्रशीक्षक बापू समलेवाले याचाही समावेश आहे. याप्रकरणी महिलेच्या फियार्दीनुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्रम मुजावर, बादशाह मुजावर, सरदारबी मुजावर, कौसर सनदी, बापू समलेवाले, तृप्ती कुलकणीर् अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित महिलेचे अक्रम याच्याशी २०२० मध्ये अक्रम याच्याशी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर दीड महिन्यापासून अक्रम, बादशहा, सरदारबी, कौसर सनदी, बापू समलेवाले पीडित महिलेचा शारिरिक, मानसिक छळ करत होते. शिवाय या संशयितांकडून महिलेला मारहाणही करण्यात येत होती. पीडित महिलेला तिच्या पतीच्या अक्रमच्या मोबाईलमध्ये तृप्ती कुलकणीर्चे आक्षेपाहर् फोटो सापडले. त्याबाबत महिलेने पतीला विचारणा केल्यानंतर त्याने आमचे एकमेकांवर प्रेम आहे. असे सांगून मारहाण केली.
त्यानंतर महिलेने ही बाब बादशाहसह बापू समलेवाले यांना सांगितली. त्यानंतरही संशयितांच्या वागण्यात फरक पडला नाही. पीडित महिलेला मुलगा झाल्यानंतर संशयितांनी तिला घरातून हाकलून दिले. पीडित महिला दुसऱ्यांदा गभर्वती झाल्यानंतर पती अक्रम आणि तृप्ती कुलकणीर् यांनी तिला गभर्पाताच्या गोळ्या जबरदस्तीने दिल्या. त्या गोळ्या खाण्यास नकार दिल्यानंतर दोघांनीही पीडित महिलेला मारहाण केली. माहेरहून दहा लाख रूपये आणण्यासाठी पीडित महिलेचा शारिरिक, मानसिक छळ केला. शिवाय बापू समलेवाले यांनी अश्लील भाषा वापरल्याचे महिलेने दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.