अभिनेत्री कल्याणी जाधव हिचा अपघाती मृत्यू
मुंबई : मराठी चित्रपट सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी पुढे येतंय. प्रसिध्द टिव्ही अभिनेत्री कल्याणी कुरुळे जाधव हिचा अपघाती मृत्यू झालाय. ही बातमी कळताच सिनेसृष्टीत शोककळा पसरलीये. अत्यंत कमी वेळामध्ये कल्याणीने एक वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा आर्श्चयाचा धक्का बसलाय. सुरूवातीला अनेकांना ही फक्त अफवा असल्याचे देखील वाटले होते.
मध्यरात्री कोल्हापूर सांगली रस्त्यावरील हालोंडी फाटा इथे डंपरने धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झाल्याचे कळते आहे. तुझ्यात जीव रंगला, जीव माझा गुंतला यासह अन्य मालिकेत कल्याणी जाधवने जबरदस्त भूमिका केल्या आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर कल्याणीने एक वेगळी ओळख निर्माण केली.
काही दिवसांपूर्वीच कल्याणी जाधव हिने हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाने एक हाॅटेल सुरू केले होते. मध्यरात्री हॉटेल बंद करून घरी परतत असताना डंपरने धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झाला. कोल्हापूर-सांगली मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्येच आता अभिनेत्री कल्याणी हिचाही मृत्यू झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.