रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांनी आत्महत्या; घरातच आढळला मृतदेह
नवी दिल्ली : दिल्लीत रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अमित जैन यांच्यावर बँकेच्या कर्जाचा भार होता असे सांगण्यात येत आहे.
गाजियाबादमधील कौशांबी येथील स्थित ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांचा शनिवारी त्यांच्या निवासस्थानी मृतदेह आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित जैन यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिसांना कंट्रोल रुमच्या माध्यमातून आत्महत्येची माहिती मिळाली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यानी या विषयी माहिती दिली. अमित जैन नोएडामधील आपल्या घरी नाश्ता केल्यानंतर गावातील घरी आले होते. अमित जैन संपूर्ण कुटुंबाला नोएडाला नेणार होते. रस्त्यात त्यांनी आपल्या भावाला गाजियाबादमधील कार्यालयात सोडलं होतं. आपण एकटेच पुढील प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमित जैन यांचा मुलगा घरी गेला असता त्याला वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी घातपाताची कोणतीही शक्यता फेटाळली आहे. याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.